Sharad Pawar : अहमदनगरमध्ये शरद पवार-अजित पवार गटात वादाची ठिणगी; दोन्ही गटाच्या जिल्हाध्यक्षांच्या नामफलकाचा वाद पोलिस ठाण्यात

Ahmednagar NCP : अहमदनगरमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शहर जिल्हाध्यक्ष माणिक विधाते यांच्या दालनावरील नामफलक हटवून शरद पवार गटाचे शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर यांचा नामफलक लावण्यात आला.
अहमदनगर: एकीकडे राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांकडून राष्ट्रवादीत फूट पडलेली नाही असं वारंवार सांगितलं जात असताना स्थानिक पातळीवर मात्र राष्ट्रवादीचे दोन गट अनेक ठिकाणी दिसून येत आहे आणि आता या दोन्ही गटांमध्ये वाद देखील व्हायला सुरुवात झाली आहे. अहमदनगरमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यालयामध्ये लावलेल्या नामफलकावरून आता शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवार गटामध्ये वादाची ठिणगी पडली आहे. 
राष्ट्रवादीचे दोन गट झाल्यानंतर स्वतंत्र पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. या निवडीनंतर अहमदनगर जिल्हा राष्ट्रवादी भवनामध्ये पदाधिकाऱ्यांच्या लावलेल्या फलकावरून वादाची ठिणगी पडली आहे. हा वाद थेट कोतवाली पोलिसांपर्यंत पोहोचला आहे.
राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडल्यानंतर राष्ट्रवादीच्या अजित पवार गट आणि शरद पवार गटाच्या स्वतंत्र पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या. अहमदनगरच्या राष्ट्रवादी भवन येथे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची दालने आहेत. त्यावर लावलेल्या नामफलकावरून वादाची ठिणगी पडली आहे. अहमदनगरमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शहर जिल्हाध्यक्ष माणिक विधाते यांच्या दालनावरील नामफलक हटवून शरद पवार गटाचे शहर जिल्हाध्यक्ष माजी महापौर अभिषेक कळमकर यांचा नामफलक लावण्यात आला आहे. त्यावरून ही वादाची ठिणगी पडली आहे. 
माणिक विधाते यांच्या फिर्यादीवरून नावाचा फलक हटवल्याप्रकरणी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर यांच्या विरोधामध्ये अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला. नामफलकाची तोडफोड केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार भाजप- शिवसेनेसोबत सत्तेत सहभागी झाल्यानंतर स्थानिक पातळीवरही अजित पवार आणि शरद पवार असे दोन गट निर्माण झाले आहेत. शरद पवार गटाकडून नगर शहर जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी माजी महापौर अभिषेक कळमकर यांच्यावर सोपवण्यात आली आहे. तर प्राध्यापक माणिक विधाते हे अजित पवार गटाचे शहर जिल्हाध्यक्ष आहेत. दरम्यान अहमदनगरचे राष्ट्रवादी भवन हे राष्ट्रवादी भवन हे राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टचे आहे त्यामुळे शरद पवार यांच्या अधिपत्याखाली हे राष्ट्रवादी भवन येत असल्याने तेथील शहर जिल्हाध्यक्ष यांच्या दालनावरती आपण स्वतःचा नाम फलक लावला असल्याचं शरद पवार गटाचे शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर यांनी स्पष्ट केले आहे. सोबतच आम्ही कोणतीही तोडफोड केली नसल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे. तोडफोड केल्याचा आरोप हास्यास्पद असल्याचं देखील त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान याबाबत अजित पवार गटाचे शहर जिल्हाध्यक्ष माणिक विधाते यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. मात्र हा वाद पुढे काय वळण घेतो हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

Popular posts from this blog

Gadar 2 Box Office Collection Day 10: 10वें दिन भी बॉक्स ऑफिस पर खूब चलेगा सनी देओल का हथौड़ा, जानिए कितनी होगी ‘गदर 2’ की कमाईGadar 2 Box Office Collection: सनी देओल की फिल्म 'गदर 2' को लेकर दर्शकों में क्रेज अभी भी बरकरार है. ऐसे में माना जा रहा है कि 10वें दिन बॉक्स ऑफिस पर 350 करोड़ रुपये के आंकड़े का पार कर सकती है.

बिग बॉस ओटीटी 2 विनर Elvish Yadav का जलवा बरकरार, अब हरियाणा CM ने यूट्यूबर को किया सम्मानितElvish Yadav Abhinandan Samaroh: बिग बॉस ओटीटी 2 के विनर search एल्विश यादव के सम्मान में हरियाणा के गुरुग्राम स्थित देवीलाल स्टेडियम में search एल्विश यादव का सम्मान समारोह रखा गया.

OMG 2 Box Office Collection Day 10: 100 करोड़ पार अक्षय कुमार फिल्म, 10 दिनों में ओह माय गॉड 2 ने किया इतना बॉक्स ऑफिस कलेक्शन!OMG 2 Box Office Collection Day 10: अक्षय कुमार की ओएमजी 2 बॉक्स ऑफिस पर जबरदस्त कमाई कर रही है. जानिए फिल्म ने अब तक कितना कलेक्शन कर लिया है.